• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीत पुन्हा जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद


आंदोलन : प्रतिक चाळके

रसायनी परिसरात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या रोगाने शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रसायनी मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने रसायनीतील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रसायनी परिसरात दोन दिवस जनता कर्फ्यु लागू केले होते.

या जनता कर्फ्युला नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. जनता कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. मोहोपाडाकडे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांच्या सोबत ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी दांडफाटा चेकनाका येथे विचारपूस करण्यात आली असून त्यांना मोहोपाडा परिसर बंद असून जनता कर्फ्यु लागू झाल्याचे सांगत होते. व बाहेरील नागरिकांना रसायनी परिसरात जाण्यापासून रोखत असताना दिसून आले.

कोरोना विषाणूने रसायनी परिसरात शिरकाव केला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जनता कर्फ्युचा निर्णय घेतला असून जनता कर्फ्युचा निर्णय घेणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनता कर्फ्युला रसायनीतील नागरिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून त्यांचे सुद्धा आभार मानले. तसेच मोहोपाड्यातील बाजारपेठ ही दिनाक २९ मे रोजी सकाळ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालू राहणार असल्याचे वासंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पवार यांनी सांगितले.