• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव


रसायनी : प्रतिनिधी

रसायनीत पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटनेची माहिती घेतली असता रसायनीतील एच.आय.एल कंपनीतील एका कामगाराला कोरोना निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार

एच.आय.एल कंपनीतील कोरोना पॉजिटीव्ह कामगार अभियांत्रिकी विभागात काम करत आहे. याचबरोबर कामोठे ते रसायनी असा त्याचा प्रवास असून संबंधित रुग्णास उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

कंपनी परिसरात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी कंपनी 3 दिवसासाठी आपत्कालीन सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व पुढील कामकाज दिनांक 22 जुन पासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

™© Copyright - dont copy this text™