- हक्कासाठी आंदोलन
रसायनीत कोरोनारुग्णांचा आकडा दहा वर

आंदोलन : प्रतिक चाळके
रसायनी परिसरातील नागरिकांनी दोन महिने सरकारच्या आदेशाचे पालन करून रसायनी परिसराला कोरोना विषाणू पासून दूर ठेवला होता. परंतु रसायनी परिसरात कोरोनाविषाणूने शिरकाव केले असून रसायनी परिसरातील आज सायंकाळी 4 च्या सुमारास रीस भटवाडी येथील कोरोनाचा रुग्ण मिळून एकूण संख्या दहा झाली आहे.
रसायनी परिसरात पहिला रुग्ण हा शिवनगरवाडी येथे तीन, दापीवली येथे तीन, चांभार्ली नवीन वसाहत येथील दोन तर श्री हरी पार्क सोसायटी मध्ये एक आणि भटवाडी येथील एक रुग्ण असून इंद्रास्त्रीत एरिया मधील एका कंपनीतील कोरोना बाधित रुग्ण हा वगळण्यात आला आहे.
भटवाडी येथे सापडलेला व्यक्ती MGM रुग्णालयात कामाला असून कामाच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचे समजते. तर श्री हरी पार्क मध्ये सापडलेला व्यक्ती हा नाविमुंबई येथे कामाला असल्याचे समजते. सदर सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपास हा चालू असल्याचे गटविकास अधिकारी नितीन परदेशी यांनी सांगितले.