• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीत कोरोनाचा शिरकाव,सहा जणांचा अहवाल पाॅजिटीव्ह


रसायनी : राकेश खराडे

दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर वाडी येथील तिघांची कोरोना चाचणी पाॅजिटीव्ह,दुर्गांमाता काॅलनी दोन पाॅजिटीव्ह,तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची चाचणी पाॅजिटीव्ह आली असून रसायनीत एकूण सहा कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून परीसरात भितीचे वातावरण आहे.या पाश्र्वभूमीवर शिवनगर वाडी परीसर कोरोना विषाणु बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

संपुर्णं देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे.लाॅकडाऊन कालातीत दोन महिने रसायनीकरांनी काटेकोर पालन केले.परंतु दोन महिन्यांनंतर कोरोनाने रसायनीत शिरकाव करुन रहिवाशांना भयभीत केले आहे.शिवनगरवाडीत राहणारा 38 वर्षींय व्यक्ती घाटकोपरला काही दिवस आपल्या बाईंकवरुन कामाला जात होता.त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने आपली कोरोना तपासणी केली.त्याच्या अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने त्याने लोहोप आरोग्य केंद्र गाठून पुढे त्याला उपचारासाठी इंडिया बुलमध्ये दाखल करण्यात आले.त्याची पत्नी व लहान मुलगी यांचीही कोरोना चाचणी अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने त्यांनाही इंडिया बुलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या लहान मुलाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील तरुण चेंबूर येथे नोकरीला जात असल्याने त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याचाही तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे.तर त्याचाच मित्र वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नविन वसाहत रिस,दुर्गांमाता काॅलनी परीसरातील एक तरुण हाही चेंबूर नवी मुंबईत कामाला जात असल्याने त्याचा व त्याच्या पत्नीचा कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला असल्याचे मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी सांगितले.मंगलवार दि.26 दुपारपर्यंत रसायनीत सहा व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.याकरीता माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून शिवनगर वाडी तसेच नविन वसाहत रिस,दुर्गांमाता काॅलनी परीसरात हायड्रोक्लोरीक जंतुनाशक फवारणी करण्यात आली.या रुग्णांच्या संपर्कांत आलेल्यांची यादी बनविण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. रसायनी करांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घेवून सोशल डिस्टिंक्शनचे नियम तंतोतंत पाळावे असे आवाहन होत आहे.