• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीकरांसाठी दिलासादायक बातमी - शिवनगर वाडीतील तिघे सुखरुप घरी परतले


रसायनी : प्रतिनिधी

कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजला असून दोन महिने रसायनीकरांनी लॉकडाऊन चे तंतोतंत पालन केल्यानंतर रसायनीतही कोरोना ने शिरकाव करून परिसरात भीती निर्माण केली आहे.

रसायनीत त्याअगोदर एकूण अकरा कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून दोन दिवसांपूर्वी श्रीहरी पार्कमधील आणखी एका कोरोना बाधिताची भर पडली आहे. या आकडेवारीतून एका कैरे जवळील कंपनीतील पदाधिकारी व्यक्तीला खारघर मध्ये राहत असल्याने वगळण्यात आले आहे. परंतु श्रीहरी पार्क येथे एकाच्या पत्नीलाही कोरोना ची लागण होऊन तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रसायनी परिसरातील भटवाडी १, श्री हरी पार्क सध्या २, नवीन वसाहत दुर्गामाता कॉलनी येथे २ असे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचा पुढील तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

तसेच रसायनी परिसरातील दापिवली ३, वावेघर १, यांच्यावरही उपचार सुरू आहेत. यातच मोहोपाडा शिवनगरवाडी येथील तीनही कोरोना बाधित यांनी मात करून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरपोच सोडण्यात आले असून, ही रसायनीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग पालन करून आपल्या स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.