• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीकरांनो सावधान!...

रसायनीत नवीन 4 कोरोना रुग्णांची भर पडल्याने घराबाहेर पडताना सामाजिक व शारीरिक अंतर राखण्याची गरज

रसायनी : गौतम सोनवणे

  रसायनीत याअगोदर एकूण बारा कोरोनाबाधित सापडले होते त्यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. यानंतर दोन आठवड्यानंतर रसायनीत पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून भटवाडी येथील अंबरनाथमध्ये नोकरीसाठी जाणा-या तरुणाचा कोरोना अहवाल पाॅजिटिव्ह आला आहे. तर रिस गावातील एकाचा अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे. रिसवाडी गावातील अपोलो हाॅस्पिटलमध्ये उपचार घेताना एकाला कोरोनाचा संसर्गं झाल्याचे समजते. तर कांबे येथील अपोलो लाॅजिस्टिकमध्ये काम करणाऱ्या तरुणाला कोरोना झाला असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सध्या चार रुग्ण सापडले आहेत. तसेच कामोठ्याहून रसायनीत एच.आय.एल कंपनीत कामानिमित्त येणा-या कामगारालाही कोरोना झाल्याने कंपनीने खबरदारी घेत परीसर निर्जंतुकीकरण केले असून कैरे येथील बिग कोला कंपनीतील कोरोना रुग्णही उपचारानंतर बरा झाला आहे. या दोन्ही कंपनी कर्मचारी रुग्णांना रसायनीतील कोरोना आकडेवारीतून वगळण्यात आले आहे.रसायनीतील कोरोना अहवाल पुढीलप्रमाणे


रसायनी परीसरातील भटवाडी 1, श्रीहरी पार्क (हरिओमपार्क) 2, रिस नविन वसाहत- दुर्गामाता काॅलनी येथे 2, शिवनगरवाडी 3 तसेच रसायनी परीसरातील दापिवली 3,वावेघर 1 यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.


परीसरात पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याने रिस 1, भटवाडी 1, कांबे 1, रिसवाडी 1 असे नव्याने चार कोरोना रुग्ण असून रीस येथील 22 वर्षीय तरुण याला कोरोनाची लागण झाली असून भटवाडी येथील 40 वर्षीय नागरिकाला कोरोना झाला आहे. सदर 40 वर्षीय नागरिक अंबरनाथ येथे फार्मासिटिकल कंपनीत कामावर जात असताना कोरोना पॉजिटीव्ह सापडल्याची माहिती मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे.

याचबरोबर दिलासादायक बातमी म्हणजे आपटा आरोग्य केंद्रहद्दीत आपटा ते दापिवली भागात सध्या कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती डाॅ.प्रियंका चव्हाण यांनी बोलताना दिली. तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना सामाजिक व शारीरिक अंतर राखून आपल्या स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन शासनाद्वारे वारंवार होत आहे.