• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाडा व चांभार्ली ग्रामपंचायत दोन दिवसाच्या जनता कर्फ्यू साठी


मोहोपाडा : गौतम सोनावणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मोहोपाडा व ग्रामपंचायत चांभार्ली यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध पाऊले उचलत आहेत. आपल्या गावाची व आपल्या स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायत मोहोपाडा व ग्रामपंचायत चांभार्ली ची संयुक्त बैठक झाली होती. तरी कोणीही या जनता कर्फ्यु चा आदेश मोडू नये म्हणून मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच - ताई पवार व उपसरपंच - राकेश खारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वासंबे येथील सभागृहात पंचायत सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.


यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या प्रभागात नागरिकांना बाहेर न पडता घरी राहण्याचे आवाहन करावे. तसेच मेडिकल व वैद्यकीय सेवा चालू राहतील. कोणत्याही प्रकारची दुचाकी व चारचाकी गाडी हाकण्यास परवानगी नसणार असून या गावातून दुसऱ्या गावात कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही. यामध्ये पाताळगंगा क्षेत्रात काम करण्याच्या कामगारांना सूट देण्यात आली असून कामाच्या वेळेतच ते ये - जा करू शकतात. कुठे दुसरी कडे फिरू शकत नाही. याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी जागोजागी कार्यरत राहणार आहेत. जे कारखाने चालू आहेत, अशा कारखान्यांना ग्रामपंचायत तर्फे नोटीस देण्यात येणार आहे की, बाहेरून कामगार कारखान्यात येता कामा नये. एकूणच ग्रामपंचायती प्रशासन दिनांक 24 व 25 एप्रिल च्या जनता कर्फ्यु ला सज्ज झाली आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच - ताई पवार, उपसरपंच - राकेश खारकर, मा. सरपंच कृष्णा पारंगे, मा. सरपंच संदीप मुंढे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे, स्वप्नील राऊत, रतन पाटील, भाग्यशी पवार, जयराम पाटील, मंगेश पाटील, संजय कांबळे उपस्थित होते. दिनांक 24 एप्रिल व 25 एप्रिल रोजी कोणीही ही घराबाहेर पडू नये व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

55 views0 comments