• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाडा - रीस हद्दीत नव्याने 9 तर लोधीवलीत 1 ने कोरोना रुग्णांची वाढ

मोहोपाडा - रीस हद्दीत नव्याने 9 तर लोधीवलीत 1 ने कोरोना रुग्णांची वाढमोहोपाडा : गौतम सोनावणे  वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वारंवार जनता कर्फ्यु लावण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत वासांबे तर्फे सतत करण्यात येत आहे. परंतु नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे.      मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 14 जुलै रोजी मोहोपाडा रीस हद्दीत नव्याने 9 तर लोधीवलीत 1 रुग्ण आढळल्याने परिसरात एकूण 10 रुग्णांची वाढ झाली आहे. आज नव्याने कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने पुढीलप्रमाणे आकडेवारी देण्यात आली आहे. आजचे कोरोना रुग्ण नवीन पोसरी       7 रीस              2 लोधीवली         1                 ---–-----------       एकूण          10