• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाडा-रिस भाजी मार्केट आता संध्याकाळीही खुले राहणार - कृष्णा पारंगेरसायनी : प्रतिनिधी

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशासह राज्य सुद्धा या लढाईला सामोरे जात आहेत. नागरिकांची गौरसोय होऊ नये म्हणून सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने हे उघडे ठेवायला सांगितले आहे.

तसेच रसायनी येथील मोहोपाडा बाजारपेठेत पंचक्रोशीतील नागरिक हे सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत खरेदीसाठी येत असल्यामुळे रोज नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच परिसरातील हातावर पोट भरणारा शेतकरी वर्ग हा मळ्यातील भाजी विक्रीवर उपजीविका करत असून एवढ्या कमी वेळात त्यांची भाजी विक्री होत नसल्याने सदर समस्येवर उपाय म्हणून आणि मळ्यातील विक्रेत्यांना रोजगारीचा आधार म्हणून मा. सरपंच कृष्णा पारंगे यांनी संध्याकाळी ४ ते ६ पर्यंत भाजी मार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यामुळे गर्दीवर सुद्धा नियंत्रण राहून परिसरातील शेतकऱ्यांचेही नुकसान सुद्धा होणार नसल्याचे मा. सरपंच कृष्णा पारंगे यांनी सांगितले.

यावेळी मा. सरपंच कृष्णा पारंगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करत परिसरातील शेतकरी वर्गाने मा. सरपंच कृष्णा पारंगे यांचे आभार मानले.