• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाडा येथील पथदिवे रात्रंदिवस चालू


(छाया : चिंतामण ठाकरे सर)


प्रतिनिधी : प्रतिक चाळके

रसायनी पसरिसारातील मोहोपाडा मराठी शाळेमागील पूर्वश्रमीचा कोंडवाडा तर आत्ताच्या पशु-उपचार केंद्रच्या बाजूला विद्युत खांब आहे. या खांबावरील दिवा रात्रंदिवस चालू आहे. तर काही ठिकाणी पथदिवे असून सुद्धा रात्री पथदिव्यांमध्ये बल्ब चालू नसल्याने उजेडा अभावी अंध:कारमय परिसर आहे. काही पथदिवे रात्रंदिवस चालु असल्यामुळे विद्युत ऊर्जा वाया जात आहे. यासाठी ज्या ठिकाणी दिवसाही पथदिवे चालू आहेत अशा विद्युत खांबांवरील दिवे योग्य वेळी बंद केल्यास विद्युत ऊर्जा वाया जाणार नाही. तसेच ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पथदिवे बंद आहेत. ते व्यवस्थित रित्या चालु करून प्रकाशित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.