• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाड्यात शिवसेने तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन


मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना महामारीमध्ये रुग्णांना रक्ताची आवश्यकता खूप भासत असल्याने रक्तदान हेच जीवदान हे उद्देश ठेवून शिवाय सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मा. आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने तसेच रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. मनोहर शेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना शाखा मोहोपाडा येथे सोमवार दिनांक 01/06/2020 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्य्ंत करण्यात येणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना, युवासेना व महिला आघाडी प्रमुख यांचे आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे. अशी विनंती उपतालुका प्रमुख रमेश पाटील व विभाग प्रमुख अजित सावंत यांनी केली आहे.