• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाड्यात शिवभोजन थाळीला उस्फुर्त प्रतिसाद

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन




रसायनी : प्रतीक चाळके


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉक डाउन आहे. लॉक डाउन मुले परिसरातील अत्यंत गरीब आणि गरजू नागरिक अन्नापासून वंचित राहू नये म्हणून रसायनीमध्ये सुद्धा शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. या शिवभोजन थाळीचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.


महाराष्ट्राचा उपक्रम असलेली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी चालू केलेली शिवभोजन थाळीला रसायनी मध्ये गरीब व गरजू नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. रसायनी मध्ये शिवभोजन थाळी हि सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत असून मोहोपाड्यात एम. ई. सी.बी च्या कार्यालयासमोर मेन रोडला चालू करण्यात आली असून जे कोणी गरीब गरजू नागरिक असतील त्यांनी संतोष पांगत ९९७५४०२७८९ आणि चेतन मेश्राम ९९७०३६६१९७ यांच्याशी संपर्क करावा.

7 views0 comments