• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोहोपाडयातील एम.एस.ई.बी कर्मचाऱ्यांचा सन्मानमोहोपाडा : गौतम सोनावणे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री. राहूलजी गांधी साहेब. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशोकभाऊ मुंढे फाउंडेशन रसायनीच्या वतीने रसायनी येथील एम.एस.ई.बी च्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे सर्व विजेचे खांब कोसळून पडले होते. त्यामुळे संपुर्ण परिसरात विज खंडित झाली होती. एम.एस.ई.बी कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी दिवस रात्र परीश्रम कऱून अवघ्या दोन दिवसांत घराघरात विज पोहोचवली. व त्यामुळे रसायनी करांचे जनजीवन सुरळीत झाले. त्याबद्दल अशोक भाऊ मूंढे फाउंडेशन रसायनी यांच्या वतीने मोहोपाडा येथील एम.एस.ई.बी कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अशोक भाऊ मुंढे फाउंडेशनच्या वतीने अशोक भाऊ मुंढे, प्रशांतशेठ गायकवाड व फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एम.एस.ई.बी कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली. यावेळी एम.एस.ई.बी अधिकारी किशोर पाटील, बाबासाहेब किर्दकुडे व वायरमन कर्मचारी उपस्थित होते.


™© Copyright - dont copy this text™