• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मिरची बाजारामुळे कोरोना बाधित रेड झोनमधील नागरिक कर्जतमध्ये, धोक्याची घंटा !कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

पावसाळा जवळ येत असल्याने पावसाळ्यात लागणारा मिरची मसाला करण्यासाठी प्रसिद्ध असलेली कर्जतची मिरची खरेदी करण्यासाठी नागरिकांची रिघ लागली आहे , या गर्दीत रेड झोन घोषित केलेल्या पनवेल तालुक्यातील ग्राहक असून चक्क शाळेची मिनी बस घेऊन मिरची खरेदी करणारे कर्जतमध्ये सापडले आहेत .मात्र त्यांच्यावर वेळीच झडप टाकून जेरबंद केल्याने पुढील धोका जरी टळला असला , तरी ह्या गाड्या चेकपोस्ट पार करत कर्जत बाजारपेठपर्यंत कशा पोहचतात , हा चर्चेचा विषय बनला आहे . अत्यावश्यक सेवेचा , शाळेचा , आरोग्य विभागाचा , किंवा इतर पास च्या गाड्या कोरोना विषाणू महामारीच्या अंतिम टप्प्यात खबरदारी घेऊन तपासणी करणे , हि काळाची गरज झाली आहे .

कर्जत तालुक्याबरोबरच शहरात देखील कोरोना बाधित एकही रुग्ण नाही .यासाठी नागरिकांनी बहुमूल्य सहकार्य केले आहे . शासनाचे व पालिकेने दिलेले नियम पाळले गेले आहेत . मात्र व्यापारी वर्ग काही नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे . कर्जतची प्रसिद्ध मिरचीचा मसाला बनविण्यासाठी मिरची बाजारात खरेदी करण्यासाठी बाहेरील ग्राहक येऊ नये , म्हणून मिरची बाजार बंद करण्याचे आदेश मा . जिल्हाधिकारी व स्थानिक कर्जत पोलीस स्टेशनचे असताना मिरची बाजार चालू ठेवणे , म्हणजे कोरोना बाधितांची " लागण " वाढविणे , हा होतो , शिवाय मिरची हि अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूत येत नसल्याने मिरची दुकानांना निदान लॉक डाऊन काळात परवानगी देणे , चुकीचे ठरेल !

त्यातच अत्यावश्यक पासाचा गैरवापर होत असून पनवेल तालुक्यातील कोरोना बाधित रेड झोन परिसरातील स्कुल बस कर्जतमध्ये मिरची खरेदी करण्यासाठी आली असल्याने चेक पोस्ट पार करताना खबरदारी घेणे गरजेचे वाटते .यापूर्वी देखील एक शिक्षक म्हसळयावरून बिनबोभाट आंबे घेऊन येताना कर्जतमध्ये सापडला असतानाचे ताजे उदाहरण आहे, त्यातच कर्जत मधील वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी देखील बाहेरील पब्लिक येत असल्याने गूळ साखर पाठोपाठ कश्या मुंग्या येतात तसा कोरोना विषाणू ह्या रेड झोन परिसरातील अशा नागरिकांच्या सोबत येऊन एव्हढ्या दिवस कोटेकोरपणे घेतलेली काळजी वाया जाऊन कर्जत देखील कोरोना बाधित परिसर होण्यास वेळ लागणार नाही , म्हणून संबंधित व्यापारी , अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी , अशी मागणी कर्जतकर करत आहेत .

118 views0 comments