• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात..

ट्रक ने दिली कठड्याला जोरदार धडक, एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी

खालापूर : विशाल वाघमारे

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे पोल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

दिनांक 20 जुन रोजी दुपारी 3 ते 4 वा. दरम्यान मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे पोल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक मधील क्लिनर जागीच ठार झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ झाला असून खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वसंत सीद (ब.क्र 1281) हे पुढील तपास करीत आहेत.