• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला कोरोना रोगाचे संकट अधिक गडद

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला कोरोना रोगाचे संकट अधिक गडद


प्रतिनिधी : पनवेल

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पंवेल परिसरातील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. शनिवारी आणखी पाच रुग्णाची भर पडली असून विशेष म्हणजे त्यामध्ये पोलीस, पत्रकार, फार्मासिस्ट, परिचारिका आणि रुग्णालयातील सफाई कामगारांचा समावेश आहे. चार जण कामोठे वसाहतीतील असून एकजण नवीन पनवेल येथील रहिवासी आहे.त्यामुळे पनवेल करांची चिंता अधिकच वाढत आहे. कामोठे येथील ५३ वर्षीय व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असून सदर व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असल्याने दररोज कामोठे ते सी.एस, टी असा प्रवास करत असल्याने संबंधित पोलीस कर्मचारी यांना एम. जी.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई येथील कामाच्या ठिकाणी अथवा प्रवास दरम्यान लागण झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण कॅन्सर ह्या रोगावर उपचार घेत आहे. कामोठे येथील ४४ वर्षीय एका महिलेला कोरोनाचे लागण झाली असून सदर महिला व्ही.एन. देसाई जनरल हॉस्पिटल सांताक्रूझ येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे.सदर महिलेला हॉस्पिटलमधून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून संबंधित रुग्णावर भामा हॉस्पिटल, कुलाबा येथे उपचार सुरू आहेत. कामोठे सेक्टर -३४ मधील २९ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली असून सदर व्यक्ती ट्रॉम्ब म्युनिसिपल डिसपेन्सरी, मुंबई येथे फार्मास्टिक म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असावा. या रुग्णावर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामोठे सेक्टर-१५ येथील ३७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून संबंधित व्यक्ती ई टीव्ही भारत मध्ये पत्रकार असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचे दिसून येते.नवीन पनवेल येथील २७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून सदर महिला सायन हॉस्पिटल, मुंबई येथे स्टाफ म्हणून कार्यरत असून या महिलेला कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे.