• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांचा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना मायेचा हात


प्रतिक चाळके : प्रतिनिधी

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या रोगानी राज्यात थैमान घातले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोरोना विषाणूच्या लढ्याला दोन हात करत कोरोना विषाणूच्या रोगाला सामोरे जात आहे. तसेच खालापूर तालुक्यातील रसायनी येथील रिस मध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रिस मधील नागरिक हे सरकारच्या आदेशाचे पालन करत आहेत.

रिस मधील बाजारपेठ ही सकाळी ८ ते १२ तर सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत चालत असून या बाजारपेठेत रसायनी परिसरातील अनेक नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. यामुळे दुकानदार आणि भाजी विक्रेते हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने सुरक्षेबाबत प्रशासनानेही दुकानदार आणि भाजीविक्रेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेत असणारे दुकानदार आणि भाजी विक्रेते यांच्या सुरक्षिततेसाठी मायेचा हात म्हणून माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांच्यातर्फे दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना मास्क आणि फेसशिल्डचे वाटप करण्यात आले.

दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना मास्क आणि फेसशिल्डचे वाटप करताना कृष्णाशेठ पारंगे यांनी मास्क आणि फेसशिल्डचा नियमित वापर करून स्वतःची काळजी घेत सरकारच्या आदेशाचे पालन करा असे मार्गदर्शन करत आवाहन केले. यावेळी दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी माजी सरपंच कृष्णा पारंगे यांचे आभार मानले.

57 views0 comments