• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मोकाट गुरे, गोशाळेसाठी मोफत चारा पाण्याची सोय


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी

पाताळगंगा : ३ मे, गेल्या दिड महिनापासून संचार बंदि असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडत नव्हते.काही महत्वाच्या कामासाठीच बाहेर पडत होते. त्याच समवेत. भाजीपाल्याचा बाजार मोठ्याप्रमाणावर भरत नसल्यामुळे भाजी मार्केट मध्ये राहिलेल्या भाज्यांवर मोकाट गुरे आपली भुक शांत करीत होते.मात्र त्यांना सुद्धा जिव असतो. मुक्या प्राण्याची भुक शांत करण्यासाठी त्यांना चारा आणी पाण्याची व्यवस्था दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहन प्राणी क्लेश प्रतिबंध समिती आलिबाग सदस्य बाळकृष्ण ज.लभडे यांनी आवाहन करताच नविन पनवेल येथिल श्री. स्वामी ईलाजेलीयक आणी महेश दाभाडे यांनी पुढाकार घेवून मुक्या प्राण्यांसाठी चारा आणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

               जयराज बापू सेवा भावी ट्रस्ट अंतर्गत गोवर्धन धाम गोशाळा लोधीवली येथे असून या गोशाळेचे संपूर्ण नियंत्रण बाळकृष्ण लभडे पाहत असल्यामुळे मोकाट गुरे तसेच गोशाळेमध्ये असणारी गुरे यांच्यासाठी विनामूल्य चारा आणी पाण्याची व्यवस्था असे आवाहन त्यांनी केले.शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जणू खांद्याला खांदा लावून ही गुरे काम करीत असतात.मात्र तालुक्याच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर मोकाट गुरे सातत्याने रस्त्यावर फिरत आहे.गेले दिड महिना संचार बंदि मुळे पोटाला अन्न हवे तेवढ्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.मात्र त्यांच्या साठी ही चारा आणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या दृष्टीकोणातून लभडे यांनी चळवळ उभी केली.

            गुरे ही गोशाळेतील असो वा मोकाट असो त्यांना चारा पाणी वेळेवर मिळणे महत्वाचे आहे.त्यांची उपासमारी होवू नये यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहे.यावेळी गुरांना चारा आणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.यावेळी पशु संवर्धन दवाखाना चौक येथिल डॉ.मर्चडे ,पशुधन विकास अधिकारी तसेच गुरांसाठी चारा पाणी मोफत देणारे  श्री. स्वामी ईलाजेलीयक आणी महेश दाभाडे आदि उपस्थित होते.


                

4 views0 comments