• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मा. आमदार मनोहर भोईर यांच्यातर्फे कराडे खुर्द येथे किराणा सामानाचे वाटप


मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉक डाऊन परिस्थिती असताना कराडे गावच्या हद्दीत व रसायनी पाताळगंगा विभागातही शासनाच्या या वाढिव लॉकडाउन ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु हातावर पोट भरणारे काम धंदे बंद असल्यामुळे रोजंदारी व मासेमारी करणारा तसेच दुसऱ्याच्या शेतात काम करून गुजराण करणारा दलित कष्टकरी आदिवासी बांधवांवर घरातच बसण्याची वेळ आली होती. रोजगार नसल्याने घरात बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या चिंतेत दलित व आदिवासी बांधव होते. त्यांच्या चिंता सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चितळे यांनी मा. आमदार मनोहर भोईर यांना सांगितलं त्याची दखल घेऊन मा. आमदार मनोहर भोईर यांनी कराडे ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती अदिवासीबांधव व झोपडपट्टीतील गरजू गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजूना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

दलीत व आदिवासी बांधवाना व झोपडपट्टीतील कुटूंबाला जीवनावश्यक किराणा वस्तू घरोघरी जाऊन वाटप करण्यात आल्या. यावेळी तेथील गरजू नागरिकांनी मा. आमदार मनोहर भोईर व शिवसेनेचे कार्यकर्ते यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे चावंडोली शाखा प्रमुख प्रशांत चितळे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी चितळे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.