• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या आवाहनाला रक्तदात्यांचा भरघोस प्रतिसाद

उरण मतदार संघामध्ये ५०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उरण तालुक्यातून ५,६८,२२२ रुपयांची भरघोस रक्कम जमा

उरण : प्रतिनिधी

१ जून रोजी मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. परंतु या वर्षी महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस असल्यामुळे महाराष्ट्रासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे हि मोठी शहरे खूप मोठ्या प्रमाणात कोरोन बाधित झालेली आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या दवाखान्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब,

यांनी शिवसैनिकांना रक्तदान करण्याच आवाहन केले.

त्यांच्या आवाहनाची दखल घेऊन उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मा. आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख.श्री.मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण मतदार संघात ५०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याआधी २९ मार्च रोजी उरण तालुक्यामध्ये जे.एन.पी.टी. टाउनशिप व कोप्रोली ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कोरोना बाधित रूग्णांसाठी जीवाचे रान करत असून हॉस्पिटल उभारत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून अनेक वेळा टी.व्ही. चायनल वर आवाहन करीत असून प्रत्येकांनी सुरक्षित घरी राहाव, मी तुमच्या पाठीशी आहे, अशी आपुलकीची व रक्ताच्या नात्याची भाषा महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळत आहे. महराष्ट्राच्या लाखो नागरिकांच्या मनामध्ये भरलेला हा महारष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या रूपाने देवमाणूस लाभला असल्याचे सोशल मिडीयावर वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. अनेक वेवेगळ्या क्षेत्रातील बुद्धीवंतानी मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे. आमच्या सारख्या शिवसैनिकांना आवाहन हे विनम्र पणे पेलण्याची इच्छा असते, म्हणून आज रक्तदान शिबिराच्या सोबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-१९ या रोगासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आवाहन केले होत. त्या आवाहनला उरण तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून ५,६८,२२२ रुपयांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मा.जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुकासंघटक बी.एन.डाकी, उरण शहराचे पदाधिकारी, महिला आघाडी, जि.प.सदस्य मोतिराम ठोंबरे, विजय भोईर, पं.स. सदस्य, नगरसेवक-नगरसेविका तसेच पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, केळवणे विभाग, चावणे विभाग, गुळसुंदे विभाग, वडघर विभाग, वासंबे विभाग, चौक विभाग, या सर्व विभागातील पदाधिकारी व शिवसैनिक, डॉक्टर, नर्स, पत्रकार यांनी एकत्रित येऊन मेहनत घेऊन हा रक्तदान शिबिर यशस्वी केला.