• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

महाविकास आघाडी व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट कडून सावळे गावात 'arsenic album 30 ' गोळ्यांचे वाटप


सावळे : रोशन कांबळे

शेतकरी कामगार पक्ष ,शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून 'सावळे' गावात arsenicum album 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनो सारख्या महामारी आजारावर मात करण्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ह्या गोळ्यांचा वापर होणार आहे. कोरोनो ह्या महाभयंकर विषाणूने जगभरात हाहाकार माजवलेला आहे.

यासंदर्भात डॉ. पी.एच.मते यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पनवेल पंचायत समितीचे सदस्य श्री. जगदिश दामोदर पवार , सावळे गावचे माजी उपसरपंच भाऊ हिरु मते,शिवसेना माजी शाखा प्रमुख श्री. काशिनाथ आंबो कांबळे , काँग्रेस नेते श्री.सुनिल नामदेव माळी, लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री.गणेश म्हस्कर, माजी उपसरपंच श्री.प्रमोद माळी, शिवसेना शाखा प्रमुख श्री.सुदर्शन महाराज मते , उपशाखा प्रमुख श्री. सागर विठ्ठल मढवी, शिवसेना गटप्रमुख कु. विकास दत्तात्रेय भांडारकर , श्री.कुशल काशीनाथ कांबळे, अँड. रोशन धर्मानंद कांबळे , शेकाप नेते श्री. नितीन माळी, श्री.सुजित पवार , श्री.भास्कर केदारी,श्री.राम भंडारकर, श्री.दत्तात्रेय झिंगे, दिलीप पवार, जयेश गाताडे, अमोल मते, रितेश मते, शेकाप युवा नेते सुधीर शांताराम गाताडे, अक्षय केदारी, अनिकेत केदारी, निखिल भांडारकर, किरण झिंगे, संदेश माळी, मयूर केदारी, हरेश माळी, कौस्तुभ म्हस्कर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते. तसेच सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे गोळ्यांचे वाटप करण्यात आले.