• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री पद शाबूत, उद्धव ठाकरे होणार आमदार !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

ज्याच्या नशिबी राजयोग आहे , त्याला कुणीही कितीही विरोध केला तरी ते त्याच्या पदरी पडतेच. असा आजपर्यंतचा इतिहास असताना ते पुन्हा एकदा सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना २७ मे पूर्वी घटनेनुसार आमदार होणे गरजेचे होते , अन्यथा त्यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात येणार असल्याने यासाठी राज्यपालांच्या शिफारशीनुसार ते आमदार व्हावे म्हणून राज्यपालांना महाआघाडीच्या शिष्टमंडळांनी विनंती करण्यात आली होती. मात्र दोन महिन्याचा कालावधी होऊन देखील मा. राज्यपाल या सूचनेला दुजोरा देत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात आले होते.

महाराष्ट्राच्या जनतेला कोरोना विषाणू संसर्ग महामारींपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद होता, कोरोना विषाणूचा काळ असल्याने २४ एप्रिल रोजी रिक्त झालेल्या विधान परिषदेची निवडणूक देखील जाहीर होत नसल्याने मुख्यमंत्री पद धोक्यात आले असताना महाआघाडीच्या सर्व पक्षातील आमदारांनी शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले होते. मात्र दुर्लक्षित केलेल्या या महत्वाच्या बाबीकडे जरा वेगळ्या भावनेने बघितले जात असल्याच्या आरोळ्या उठत असतानाच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी २१ मे २०२० रोजी निवडणूक घेण्याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे हा तिढा आता सुटला असून या निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे आमदार होऊन त्यांचे मुख्यमंत्री पद शाबूत राहील.. यात शंकाच नसेल.

रिक्त झालेल्या जागा -

भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १

निवृत्त झालेले सदस्य -

शिवसेना -

१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)

भाजप -

१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस -

१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर

काँग्रेस -

१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)

पक्षीय बलाबल -

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक २९ मते.