• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मनसेच्यावतीने वाशिवली येथे रक्त दान शिबिराचे आयोजन


डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथे मनसे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते (छाया : राकेश खराडे)


रसायनी : राकेश खराडे

सर्वात मोठे दान रक्तदान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्त दान करुन अनेकांचे प्राण वाचवू शकतो.कोरोनाच्या महामारी मध्ये रुग्णांना रक्ताची खूप आवश्यकता भासत असते.हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याहस्ते या शिबिराला सुरुवात करण्यात आली.

यावेळी रायगड जिल्हा मनसे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील ,रायगड जिल्हा मनसे उपाध्यक्ष दीपक कांबळी, जिल्हा संघटक रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अभिजित घरत,महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष अभिषेक दर्गे ,खालापूर तालुका मनसे अध्यक्ष सचिन कर्णूक,खालापूर तालुका मनसे उपाध्यक्ष सतीश घोडविंदे , भास्कर डुकरे, शरद घोडविंदे, नारायण पाटील, भुषण पाटील, मंदार पाटील,सुरेश पवार, विजय शिंदे,समीर सालुंखे, कुमार पवार आदी उपस्थित होते.रक्तदान शिबीराचे आयोजन सौंदर्य हॉस्पिटल घाटकोपर,तसेच समर्पण ब्लड स्टोरेज खोपोली यांच्या सौजन्याने डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथे घेण्यात आले.