• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मद्य खरेदीसाठी रेड झोन मधून आलेल्या नागरिकांवर रसायनी पोलिसांची कारवाई

रसायनीमध्ये मद्यखरेसाठी परिसराबाहेरील नागरिकांची गर्दी

मद्य खरेदीसाठी रेड झोन मधून आलेल्या नागरिकांवर रसायनी पोलिसांची कारवाई

रसायनी : राहुल जाधव

केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोना रोगाच्या लढ्याला सामोरे जात असून संपूर्ण देशभरात लॉक डाऊन लागु करण्याचे निर्णय हाती घ्यावे लागले. वाईन शॉपवर नागरिकांची रेलचेल होत असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारद्वारे गेले दोन महिने मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. 40 दिवसांच्या कालावधीनंतर सरकारने रायगड जिल्हा हा ऑरेंज झोन घोषित केल्यानंतर रायगड जिल्ह्यात कोरोना संदर्भातील नियम शिथिल करत मद्यविक्रीसाठी परवानगी दिली. या खालोखाल रसायनीतील मद्यविक्रेत्यांनी सरकारच्या नियमांचे पालनसुद्धा केल्याचे दिसून येत आहे. मात्र पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथून येणाऱ्या मद्यप्रेमींनी सरकारच्या नियमांना पायदळी तुडवत रसायनीमध्ये दारू खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

रसायनीतील मद्यप्रेमींकडूनच समजते की रसायनी विभागात असणाऱ्या वाईन शॉप येथे बाहेरील व्यक्ती दारू खरेदीसाठी येत असतात. गंभीर बाब म्हणजे पनवेल महानगरपालिका मधील 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने पनवेल मधील नागरिक सीमेचे उल्लंघन करीत दारूसाठी रसायनित दाखल होतात. जर रसायनी परिसरात असेच बाहेरील ठिकाणचे मद्यप्रेमी हे मद्यखरेदीसाठी रसायनीमध्ये येत असतील तर रसायनी विभागामध्ये सुद्धा कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

रसायनीतील मद्यविक्रेत्यांनी रसायनीतील मद्यप्रेमींना दारू खरेदीसाठी आधारकार्ड आवश्यक केले असल्याने रसायनीतील काही नागरिक आधारकार्डवर दारू घेत असून परिसराबाहेरील मित्रांना दारू देत असल्याचे निदर्शनास आले आहे. रसायनीतील स्थानिक नागरिकांना या गोष्टीचा नाहक त्रास होत असल्याची जाणीव रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना होताच रसायनी पोलिसांकडून कठोर भूमिका घेत मद्य खरेदीकरिता परिसराबाहेरील नागरिकांवर सामाजिक अंतर तसेच P1 / P2 अंतर्गत उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात येत आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी यावेळी सांगितले.