• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

मद्यप्रेमींकडून सरकारच्या नियमांचे उल्लंघन; रसायनीमध्ये मद्यप्रेमींच्या मद्य खरेदीसाठी बेशिस्त रांगा


रसायनी : प्रतिक चाळके

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आणि प्रशासन हे कोरोना विषाणूच्या लढ्याला दोन हात करत असून कोरोना विषाणूच्या लढ्याला सामोरे जात आहे. तसेच सरकारने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गेले दोन महिने मद्यविक्रीही बंद करण्याचे आदेश दिले होते. रायगड जिल्ह्याचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता सरकारने रायगड जिल्हा हा "ऑरेंज झोन" घोषित केला आहे.

रायगड जिल्हा "ऑरेंज झोन" केल्यानंतर सरकारने रायगड जिल्ह्यात मद्यविक्रीसाठी परवानगी दिली आहे. सरकारने मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांना ६ फूट अंतर डिस्टन्स ठेवण्याचे सांगितले आहे. सरकारच्या नियमांचे पालन करत रसायनीमधील मद्यविक्रेत्यांनी सोशल डिस्टन्ससाठी चौकोन आखले असून दोन महिन्यानंतर मद्य खरेदीसाठी आलेल्या मद्यप्रेमींनी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता लांबच्या लांब रांगा लावल्याचे निदर्शनास आले.

मंगळवार दि. 5 मे रोजी अमर वाईन्स आणि डिंपल वाईन्स यांच्या दुकानासमोर सकाळपासूनच मद्यप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा सुरळीत करण्यासाठी डिंपल वाईन्स आणि अमर वाईन्स मद्यविक्रेते यांनी लाऊड स्पीकरद्वारे मद्यप्रेमींना सरकारच्या नियमांचे पालन करा तसेच सोशल डिस्टन्सचे भान ठेवा असे सूचना करण्यात आल्या. तसेच मद्यविक्रेत्यांचा एक माणूसही मद्यप्रेमींना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगत असूनसुद्धा मद्यप्रेमींनी त्याकडे दुर्लक्ष करत सरकारच्या नियमांना पायदळी तुडवले असल्याचे दिसत होते. जर असाच गर्दीचा प्रभाव सुरू राहिला तर कोरोना रोगाचा धोका रसायनी परिसरात उद्भवण्यास वेळ लागणार नाही.

™© Copyright - dont copy this text™