• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

भिसेगाव परिसरात थर्मल स्कॅनिंग व प्रतिकारशक्ती डोस आणि मास्कचे वाटप !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत नगर परिषद हद्दीत कोरोना विषाणू बाधित एकूण ९ रुग्ण सापडल्याने प्रशासन हादरले असून नागरिकांची सुरक्षा व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कर्जत बाजारपेठ तीन दिवस बंद व कोरोना विषाणू प्रथम चाचणी नॅशनल कमिशन फॉर वुमेन व डीजीपी होमगार्ड अँड सिव्हील डिफेन्स आणि कर्जत नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद हद्दीत मोफत मास्क , होमिओपॅथिक मेडिसिन , थर्मल स्कॅनिंग आदी कॅम्पची सुरुवात प्रत्येक प्रभागात केली . आज भिसेगाव परिसरात सर्व नागरिकांची तपासणी करून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डोस देण्यात आले . यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन तपासणी करून घेतली , यांत महिला , लहान मुले , जेष्ठ नागरिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कँपला प्रतिसाद दिला.

डॉ नितीन पावले , राजाराम पवार , एफराज बॉम्बले हे वैद्यकीय पथक डॉ साजिद सय्यद , कल्पेश जैन , दर्शन पोपट , संध्या फर्नांडिस , नसर शेख , डॉ संगीता पाटील , शरीन अग्रवाल , आदींनी काम पाहिले . यावेळी मोफत मास्क , लहान मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले . यावेळी भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , भिसेगाव ग्रामस्थ मंडळ व तरुण स्वयंसेवकांनी उपस्थित राहून सहकार्य केले .