• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सह- सचिवपदी नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती

भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सह-सचिवपदी भाजपचे युवा राहुल नेते सखाराम जाधव यांची नियुक्ती

खोपोली : प्रसाद अटक

भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. शांत प्रकाश जाटव साहेब यांचा संमतीने भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सह- सचिव पदी भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. राजू चौहान यांनी दिनांक १५ मे २०२० रोजी पत्राद्वारे जाहीर केली.

राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार म्हणून खोपोली नगरपरिषद २०१६ ची निवडणूक त्यांचे वडील हट्रिक किंग खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. सखाराम जाधव यांच्या पारंपारिक प्रभाग क्रमांक १ मधुन लढवली होती. यांचा या ऐनवेळी उमेदवारीने त्यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यांनी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, सोशल मीडिया मध्ये सक्रिय असणारे राहुल जाधव यांनी भाजप सोशल मिडिया रायगड जिल्हा सह- संयोजक तसेच कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) अशा विविध जवाबदर्याचे काम केले व करीत आहेत.

राहुल जाधव फौंडेशन (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, कला व क्रिडा क्षेत्रात ते काम करीत आहै.

संघटनेचे नियम व वैचारिकतेचे पालन करून संघटना मजबूत करण्याचे कार्य आपण कराल. कामगार व नियुक्तीचे मध्य समन्वय बनवण्याचे कार्य आपण कौशलपूर्णक कारला आशा शुभेच्छा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. राजू चौहान यांनी दिल्या आहेत. सर्व लोकांबरोबर चांगला संपर्क असणाऱ्या राहुल जाधव यांच्या या नियुक्तीसाठी भारतीय जनता पार्टी व त्यांचा मित्र परिवार कडुन शुभेच्छा देण्यात येत आहेत.

41 views0 comments
™© Copyright - dont copy this text™