• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

भिंगारवाडी गाव सील, कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

भिंगारवाडी गाव सील, कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित


अलिबाग : जि.मा.का रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून पनवेल ग्रामीण भागात सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी पो.आजिवली या गावात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने भिंगारवाडी हे संपूर्ण गाव आणि त्या परिसर क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. भिंगारवाडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास आणि बाहेरील दुसऱ्या ठिकाण स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरील नागरिकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

199 views0 comments

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ