• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

बाहेरून आलेल्या मुंबईकरामुळे गुंडगे रोड परिसरात कोरोना बाधित रुग्ण !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहरातील गुंडगे रोड परिसरात असणाऱ्या मंगलमुर्ती अपार्टमेंट ,(दगडे सूपर मार्केट समोर) या इमारतीत तिसऱ्या माळ्यावर रहाणारा मुंबईकर कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आज या परिसरात हाहाकार माजला .आज सापडलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यातील ११ वा रुग्ण आहे . बाहेरून आलेल्या नागरिकांमुळेच कर्जतमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे सिद्ध झाले असून प्रशासन यावर काय प्रतिबंध करणार , याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे .

गुंडगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगलमूर्ती इमारतीमध्ये हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.आठ दिवसापूर्वी मुंबई येथून हि व्यक्ती आपल्या पत्नी व दोन मुलांना घेऊन मंगलमर्ती इमारतीमध्ये रहावयास आला होता . दोन दिवसापूर्वी त्यांस त्रास जाणवू लागला म्हणून त्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले असता आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. म्हणजेच तो कोरोना विषाणू बाधित मुंबई येथेच झाला होता . शासनाच्या "घर वापसी " यामुळे कर्जत हे " आवो जावो घर तुम्हारा " , असे बनले असून शासनाचे सर्व नियम बासनात गुंडाळून हि लोक कर्जतमध्ये येत असून याकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे , अशा नागरिकांमुळे प्रशासनाबरोबरच त्या - त्या परिसरातील नागरिकांचा ताप वाढत असल्याचे दिसून येत आहे .

सदरची मंगलमूर्ती हि इमारत सील केली असून संपूर्ण इमारत व परिसर सॅनेटायझर फवारणीने स्वच्छ केली असून या इमारतीपासून १०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे .तर त्यांच्या कुटुंबातील पत्नी व मुले यांची टेस्ट रिपोर्ट काय येतेय , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . कोरोना बाधित क्षेत्रातून आलेले नागरिकांना एकाच ठिकाणी कोरंटाईन करून ठेवल्यास कोरोना बाधित रुग्णांची साखळी वाढणार नाही , अशी नागरिकांची पूर्वीपासूनच मागणी असतानाही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असून कोरोना बाधित रुग्ण हे स्थानिक कोणीच नसून सर्व बाहेरून आलेले नागरिक आहेत . बाजारपेठ बंद ठेवणे हा उपाय नसून कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांचा बंदोबस्त करणे , हेच उचित ठरेल , अन्यथा हि कोरोनाची साखळी वाढतच जाईल , हीच शंखा वाटते .