• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

ब्रेकिंग न्युजमोबाइल रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू..


ब्युरो रिपोर्ट

लॉकडाऊनमध्ये काही व्यवहारांना तसेच अन्नप्रक्रिया उद्योग, दूध डेअरी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सहसचिव सलीला श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचे काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे.

याशिवाय सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

त्यासोबतच मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानेही सुरू राहणार असून पंख्याची दुकाने सुरू ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे.

तसेच फळांची आयात- निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांना सूट दिली गेली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानेही सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


12 views0 comments

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ