• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

बोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम

अपघातग्रस्त वाहन प्रदर्शनातून प्रबोधन...

बोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम


खालापूर (ता.21जाने) : मनोज कळमकर

हौस आणि प्रसंगी खिशाला काञी लावत घेतलेले वाहन जर रस्ता सुरक्षा नियमाचे पालन न करता चालवले तर जीव तर जातो पण वाहन भंगार कसे होते याचे परिणामकारक उदाहरण बोरघाट वाहतुक पोलीसानी प्रदर्शनातून दाखवून दिले.

32व्या रस्ता सुरक्षा अभियानासुरू असून वाहतुक पोलीस अपघात कमी होण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित आहेत. गुरूवारी 32 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 निमित्ताने द्रुतगती मार्गावरील आफकोन कम्पनीचे अभियंते, कामगार, मजूर याना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व पटवून देण्यात आले. सडक सुरक्षा - जीवन सुरक्षा या घोषवाक्याप्रमाणे दुचाकिस्वारानी हेल्मेट चा वापर करणे, चारचाकी चालविताना सिट बेल्ट लावणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्त्यावर वाहन उभे न करणे, दारु पिऊन वाहन न चालवणे, वाहन चालविताना मोबाइलवर न बोलणे, दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास न करणे याबाबत माहिती देऊन वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबतचे बॅनर्स दर्शनी भागावर वाहतुक पोलीसांकडून लावण्यात आले. तसेच अपघाताबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अपघातग्रस्त कार आणि मोटारसायकल अशी वाहने अमृतांजन ब्रिज या ठिकाणी दर्शनी भागावर ठेवून त्या अनुषंगाने बॅनर्स लावून वाहन चालकामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजनेतून 2020मध्ये अपघात पन्नास टक्के कमी आणले.आता रस्ता सुरक्षा अभियानातून अपघात प्रमाण आणखी कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(स.पो.निरीक्षक परदेशी म.पो. केंद्र बोरघाट)

8 views0 comments
™© Copyright - dont copy this text™