• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

बुद्धजयंती निमित्त नगरसेवक उमेश गायकवाड यांचे गोरगरीब आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!

बुद्धजयंती निमित्त नगरसेवक उमेश गायकवाड यांचे गोरगरीब - गरजू - आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळाला ५० दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना आजही राज्यात संचारबंदी , लॉक डाऊन लागू आहे .याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला असून गोरगरीब , गरजू , हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची मात्र काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणे म्हणजेच याच मरणयातना का ? याचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते . काम नसल्याने , रोजगार अभावी रोजच्या पोट भरण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू विकत कशा घेणार ? लहान लेकरांची पोट कसे भरणार ? या विवंचनेत भुकेली माता , कुटुंबाची गृहिणी असताना त्यांनी हे दिवस कसे काढले असतील ? सर्वच कुटुंब हातावर कमावणारे , घरात लहान चिली - पिली मुले असल्याने दैनंदिन रोजच्या खाण्याचे सामान खरेदी करण्यास पैसे गाठीशी नसताना पोट भरण्याचे संकट उभे राहिले असताना गुंडगे प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश ( अप्पा ) गायकवाड यांच्या सारखी दानवीर व्यक्ती त्यांच्या मदतीला उभी राहून आदिवासी , गोरगरीब , गरजू नागरिकांच्या ह्या समस्या उमजून त्यांनी जीवनावश्यक दैनंदिन वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.

गुंडगे प्रभागात जो गोरगरीब आहे , हातावर कमावून पोट भरणारा वर्ग आहे , त्यांना धान्य , खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन मदत करणे म्हणजे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याची ,सामना करण्याची प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे महान कार्य आज कर्जत - गुंडगे प्रभागात नगरसेवक उमेश श्रीरंग गायकवाड यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी अन्न धान्य वाटप करून आपण हि या समाजाचे देणं आहे , म्हणूनच देशसेवेचे दर्शन घडविले . प्रभागातील अनेक गरजवंतांना या पन्नास दिवसात त्यांनी मदत केली , रक्तदान शिबीर त्यांनी याअगोदर घेऊन राज्यात रक्ताचा तुटवडा असताना त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र ठरते.

गुंडगे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शासनाचे नियम पाळले गेले , यावेळी व्यासपीठावर नगरसेवक उमेशअप्पा श्रीरंग गायकवाड ,कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर , नायब तहसीलदार सुधाकर राठोड , रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सिंग , रेल्वे पोलीस निरीक्षक पांडुरंग उबाळे माजी नगराध्यक्ष राजेश लाड , माजी उपनगराध्यक्ष वसंतमामा सुर्वे , डॉ . ढवळे , सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी , सामाजिक कार्यकर्ते दिशा केंद्राचे अशोक जंगले , पोलीस पाटील कमलाकर शिंदे , कांगणे सर , जैतु पिरकड , मिलिंद पवार , रिचर्ड राव , एमपीएससी ची परीक्षा देणारे रुपेश ठाकरे , संदीप शिंदे , दिनेश सविते ,आदी मान्यवरांच्या तसेच पत्रकारांच्या हस्ते अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले .यावेळी गुंडगे , पंचशीलनगर , ठाकूरवाडी , भोईआळी , संत रोहिदास नगर , येथील २०० गरजूंनी याचा लाभ घेतला . नगरसेवक उमेशअप्पा गायकवाड व मित्र मंडळाच्या या अन्न धान्य वाटपाच्या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले.

35 views0 comments
™© Copyright - dont copy this text™