• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

बस, दुचाकीचा अपघात; 1 ठार!

अलिबाग :-

शहराजवळील विद्यानगर येथे आज सकाळी जेएसडब्ल्यू कंपनीची बस आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना (25 एप्रिल) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. केसरीनाथ सदाशिव पाटील (वय 67 वर्षे, रा. खिडकी, ता. अलिबाग) हे खिडकी येथून अलिबागकडे जात होते.

विद्यानगर स्टॉपजवळच अलिबागवरुन विद्यानगरच्या दिशेने येत असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसची आणि या दुचाकीची जोरदार धडक झाली. यात केसरीनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणले होते. या घटनेेची नोंद करण्याचे काम सुरु आहे.