• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पुलाला धोका होण्याची शक्यता..

पुलाखाली दगड मातीचा ढिगारा!

पावसात वहाते पाणी अडून पुलाला धोका होण्याची शक्यता..

(पुलाच्या गाळ्यात ठेवलेला ढिगारा, छाया - अर्जुन कदम)


चौक : अर्जुन कदम

नदीच्या पुलाखाली दगड मातीचा ढिगारा ठेवल्याने पावसात पुलाला धोका निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ जुना मुंबई-पुणे मार्गावर ग्रामपंचायत वावंढळ हद्दीत वावंढळवाडी येथे ब्रिटिश कालीन पूल आहे.हा पूल पूर्वी अपघातग्रस्त होता.हा महामार्ग दुपदरी करताना जुन्या पुलाला जोडूनच नवीन पूल बांधण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गेलं या गॅस कम्पणीची पाईप लाईन खोपोली ते पनवेल कडे जात आहे. अशी माहिती मिळते. तशी ती पूर्ण रायगड जिल्ह्यात जाणार आहे.ही गॅस पाईपलाईन जुना मुंबई-पुणे रस्त्याला समांतर जात आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत तर काही ठिकाणी दूर अंतरावरून जात आहे. याचे कारणही कळत नाही.महानगर गॅस लि. नावाने हे काम सुरू आहे,सद्द्या लॉकडाऊन मुळे काम बंद आहे. ही पाईपलाईन वावंढळवाडी पुलाच्या खालुन नदीपात्रातून जाताना पुलाच्या कडेनेच नेली आहे,नदीपात्रातून जाताना नदीपात्र खोदताना मोठमोठे दगड पोकलन च्या सहाय्याने फोडण्यात आले आहेत. हे फुटलेले मोठे दगड पुलाखाली एकत्र ठेवले आहेत, जेथुन पाणी वहाते.उन्हाळ्यात पाणी कमी आहे,मात्र पावसात या नदीला मोठे पाणी असते,भिलवले धरणाचे पाणी देखील याच नदीतून जात असल्याने पावसाळ्यात हे पाणी पुलाच्या एका गाळयात थांबून राहिल्यास पुलाला धोका होऊ शकतो. याची जाणीव समबंधीत काम करणाऱ्या यंत्रणेस नसावी का? हा जुना पूल असल्याने आणखी भीती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन मध्ये हे कुणाच्याही लक्षात येणार नाही. त्यामुळे पावसा पूर्वी हा ढिगारा काढणे गरजेचे आहे.हे काम वेळीच करा असे आवाहन नितीन देशमुख यांनी केले आहे.


35 views0 comments