• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पुरोहितांच्या हाकेला सामाजिक संस्थाची साद

पुरोहितांना केले धान्याचे वाटप

पत्रकार मित्र असोसिएशन व श्री. प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचा पुढाकार


पनवेल : प्रतिनिधी

घरोघरी धार्मिक अनुष्णनांच्या माध्यामातून भक्तरीचे दीप उजळणारे पुरोहित लॉकडाउनमुळे संकटात सापडले आहे. धार्मिक अनुष्णनांने घराघरांना चमक देणाऱ्या या पुरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची हाक पनवेलमधील पुरोहितांकडून देण्यात आली होती. त्या हाकेला साद देत पत्रकार मित्र असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टने पुढाकार घेऊन शनिवारी ता.25 रोजी परिसरातील पुरोहितांना धान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष उमेश सचदेव, सेक्रेटरी मनोज देढिया, खजिनदार गोपाळ गिडवानी पत्रकार संजय कदम, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

पनवेल परिसरात पुरोहित्य करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. पौरोहित्यावरच हि मंडळी आपले संपूर्ण आयुष्य घालवते. मौन्ज, विवाह, वास्तुशांती, सत्यनारायण पूजनापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यत प्रत्येकाचे पुरोहित वेगळे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सगळेच घरातल्या घरात बंद झाले आहेत. सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाली आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आणि अक्षयतृतीय यासारख्या पौरोहितांसाठी अत्यंत महत्वाचे सण याच लॉकडाउनमुळे निघून गेले आहेत. एप्रिल, मे आणि जून हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून विवाहसोहळ्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. ते सगळे सोहळे रद्द अथवा स्थगित झाले आहेत. या सगळ्यांमध्ये पुरोहित वर्ग अत्यंत महत्वाचा असतो. एकप्रकारे हे सगळे सोहळे रद्द झाल्याने यातून मिळणाऱ्या दक्षिणापासून पुरोहितवर्ग वंचित झाला आहे. त्याचा फटका संपूर्ण वर्षभर बसणार असल्याने हा वर्ग चिंतीत असल्याने पनवेलमधील पुरोहित दीपक दीक्षित यांनी सोशल मोडियाच्या माध्यमातून मदतीची हाक दिली होती. त्यानुसार पनवेल परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी पत्रकार मित्र असोशिएशन व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट या संस्थेने पुरोहितांच्या हाकेला साद देत शुक्रवारी पुरोहितांना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लॉकडाउनमध्ये पनवेल परिसरातील हजारो गरीब गरजू कुटूंबाना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केलेल्या पत्रकार मित्र असोशिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट या दोन्ही संस्थेच्या कार्याचे पनवेल तालुक्यात कौतुक होत आहे.