• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून खालापूर मध्ये सॅनिटायझर चे वाटप


खालापूर : प्रसाद अटक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सर्वच यंत्रणा सज्ज झाली तसेच कोरोना विषाणू इतरत्र पसरू नये याची काळजी घेण्यात येत आहे . कोरोना विषाणू च्या संकटावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा व काही सामाजिक संस्था सज्ज झाले आहेत. कोरोना विषाणूचा लढा देणाऱ्या यंत्रणेला विविध माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे. खालापूर मधील असणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना चा प्रादुर्भाव रोखला जावा या करिता मोफत सॅनिटाझर चे वाटप करण्यात आले.

वाटप करण्यासाठी उपक्रमात खालापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा शिवानीताई संतोष जंगम, शेकापचे नेते व विद्यमान नगरसेवक संतोष जंगम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस वैभव भोईर, तालुका उपाध्यक्ष रणजित सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य दीपकदादा बोंदांर्डे, कर्जत विधानसभा उपाध्यक्ष संजय मुळेकर, खालापूर शहर शेकाप चिटणीस आकेश जोशी, खालापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष गुरव, युवक अध्यक्ष रोशन खराळ, जेष्ठ नेते राजा गावडे, सचिन खंडागळे, गणेश गायकर, अनंत पाटील आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.