• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

प्रिआ स्कुल ची 100 टक्के निकालाची परंपरा कायम


रसायनी : प्रतिनिधी

मोहोपाडा येथील प्रिआ स्कुलने इयत्ता 10 वी च्या 100टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. यावेळी परीक्षेसाठी एकूण 106 विद्यार्थी बसले होते. त्यातील 51 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले तसेच पहिल्या श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी व दुसऱ्या श्रेणीत 5 विद्यार्थ्यांनी यश संपादक केले.

पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे

1) तरुण प्रकाश परिहार = 93.00%

2) खुशी किशोर म्हात्रे = 92.80%

3) संतोष लक्ष्मीप्रसाद धमाल = 92.40%



सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल संपादन करून प्रिआ स्कुलचे नाव अभिमानाने उंचावले. प्रिआ स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. जोसी जोसेफ मॅडम, प्रिआ स्कुल कमिटीच्या चेअरमन सौ. उल्का धुरी व सर्व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालकांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


122 views0 comments