• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

प्रविण काकडे यांची राज्यपाल नियुक्त कोटयातून विधान परिषदेवर निवड व्हावी - महादेव कारंडे


 रसायनी : राकेश खराडे

       महाराष्ट्रात   आगामी काळात राज्यपाल नियुक्ती विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत, यासाठी धनगर समाजाचे नेते तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  प्रविण पांडूरंग काकडे यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी मोहोपाडा येथील महादेव कारंडे यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही भारतातील सर्वात मोठी  धनगर समाज संघटना असून आज रोजी संपूर्ण भारतात या संघटनेचे कार्य अविरत सुरू आहे.

 भारतातील ही एक अशी धनगर समाज संघटना आहे ज्यामध्ये कोणताही शाखा, पोट शाखा असा भेद न मानता सर्व धनगरांना एकाच झेंडयाखाली एकत्र आणण्याचे कार्य ऑल इंडिया धनगर महासंघ  गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे.

अशा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे सर यांनी सुध्दा महाराष्ट्रात विखुरलेल्या , अनेक पोटजाती, शाखा यामध्ये विभागल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्र आणण्याचे काम निस्वार्थीपणे केले आहे आणि सुरूच ठेवले आहे. त्यांनी दऱ्याखोऱ्यांमध्ये विखुरलेल्या मेंढपाळ, गरीब होतकरू विदयार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत.

आपले कुटुंब सांभाळत वेळप्रसंगी स्व:खर्चातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून धनगर समाजाला एकत्र आणण्यासाठीचे अविरत प्रयत्न बघता महाराष्ट्र राज्याचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने  प्रविणजी काकडे सर यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी महादेव कारंडे यांनी