• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पारले कंपनीकडून वावोशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

पारले कंपनीकडून वावोशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान, मास्क आणि सॅनिटाइझरचेही केले वाटप

वावोशी : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरखिंडी येथील पारले बिस्कीट कंपनीकडून वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप शिंदे, सीमा पाईकराव, सुनील पंडित, नर्स, आरोग्य सहाय्यक आणि सर्व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पारले कंपनीचे व्यवस्थापक किशोर शेळके आणि कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अशा परिस्थितीत डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता या विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करीत आहेत. अशा महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महान व्यक्तिंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पारले कंपनीने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पारले कंपनीचे व्यवस्थापक किशोर शेळके आणि त्यांचे सहकारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपणही या युद्धात खारीचा वाटा उचलला पाहिजे या जाणिवेतून पारले कंपनीमार्फत वावोशी आरोग्य केंद्र यांना फुल मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले. त्यांच्या या कार्याचे वावोशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिंदे, डॉ. सीमा पाईकराव आणि सर्व कर्मचारी यांनी आभार व्यक्त करित कौतुक केले आहे.