• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पारले कंपनीकडून खोपोलीच्या श्री वासुदेव सेवा मंडळाला बिस्किटांचे वाटपवावोशी : जतिन मोरे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने २२ मार्च पासून पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये खोपोलीमधील जे रोजंदारीवर काम करणारे मोलमजूर, गरीब लोक आहेत अशा गरजू लोकांना अविरतपणे अन्नदान करणाऱ्या खोपोलीमधील श्री वासुदेव सेवा मंडळाला पारले बिस्किट्स कंपनीकडून सामाजिक बांधिलकी जपत बिस्किटांचे वाटप केले आहे.

यापूर्वीही पारले कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत छत्तीशी विभागातील वावोशी, गोरठण बुद्रुक, होराळे, शिरवली आदी सर्व ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था, संघटना, खालापूर तालुक्यासह कर्जत, सुधागड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती यांनाही बिस्किटांचे मोठया प्रमाणात वाटप करुन शासनाच्या सहाय्य निधीलाही आर्थिक मदत केली आहे तसेच खोपोली पोलिसांनाही सेफ्टी हँड ग्लोव्हजचे वाटप तर काही ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून कोरोनाविषयी जनजागृतीही करण्यात आली.