• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पाताळगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू


मोहोपाडा : गौतम सोनावणे

पातळगंगा नदीपात्रात एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत प्रेम कुमार मुरलिधरण जाधव, वय 38 वर्षे, राहणार आळी आंबिवली यांनी रसायनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिनांक 31 मे 2020 रोजी सकाळी दहा वाजता वाजण्याच्या सुमारास पाताळगंगा रसेश्र्वर मंदिराजवळील नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला याबाबत पोलिस ठाण्याच्या व.पो.नि सुजाता तानवडे यांनी तात्काळ माहिती मिळताच आपल्या पोलीस टीम सह घटनास्थळी भेट दिली व त्या ठिकाणी पाहणी करून सदर महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

महिलेचे नाव सिंधू शिवाजी शिंदे वय 50 वर्षे, रा. आळी आंबिवली मोहोपाडा येथील असून दिनांक 30 मे 2020 या तारखेपासून दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी ठीक ठिकाणी फोन द्वारे चौकशी केली होती. परंतु सिंधूबाई भेटल्या नाही तर

सिंधूबाई शिंदे यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी दिनांक 31 मे रोजी सकाळी 10 च्या सुमाराला पाताळगंगा नदीपात्रात आढळला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी चौक येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून पाताळगंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू 13/2020 सीआरपीएफ 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. म्हात्रे अधिक तपास करत आहेत.