• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पंचायत समिती खालापूर ची ग्रामपंचायतींना मदत सभापती वृषालीताई पाटील यांचे योगदान

पंचायत समिती खालापूर ची ग्रामपंचायतींना मदत सभापती वृषालीताई पाटील यांचे योगदानमोहोपाडा : प्रतिनिधी

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले असून खालापूर तालुक्यातील पंचायत समिती खालापूरच्या सभापती सौ. वृषाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोविड-19 कोरोना विषाणूचा शिरकाव तालुक्यात होऊ नये यासाठी विविध उपाय योजना अमलात आणल्या असून काही ठिकाणी सभापती वृषाली पाटील यांनी गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदती चा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. पंचायत समिती खालापूरच्या सभापती वृषाली पाटील यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समिती सेस फंडातून प्रतिबंधात्मक साहित्य वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, आरोग्य सेवक, डॉक्टर, परिचारिका कर्मचारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक स्वयंसेवक यांनी आपल्या गावात कोरोना विषाणू बाबत प्रबोधन करीत आहेत त्या बाबत पंचायत समिती

खालापूर यांनी तालुक्यातील 44 ग्रामपंचायत व चार आरोग्य केंद्राला पंचायत फंडातून मदत केली आहे तसेच मुंबई-पुणे मुख्य रस्त्यावर खालापूर तालुका असल्यामुळे बाहेरील स्थलांतरित कामगार दरमजल करीत आपल्या गावी निघाले होते त्या कामगार यांना खालापूर येथे पंचायत समिती सभापती वृषाली पाटील यांनी महिनाभर पुरेल इतके किराणा सामान व जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे शिवाय परिसरातील रीक्षा चालत जे आपले हातावर पोट भरत आहेत त्यांची उपासमार होत असल्यामुळे वृषाली पाटील यांनी त्यांना किराणा सामानाची जीवनावश्यक वस्तू वाटप करून मदतीचा हात दिला आहे यावेळी मा सरपंच कृष्णा पारंगे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

66 views0 comments