- हक्कासाठी आंदोलन
परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊन सुरूच राहणार

दिल्ली :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असून येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन वाढणार की संपणार हे स्पष्ट होणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले : ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर नाही, अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सूट देण्यात येईल.
देशातील आर्थिक व्यवहार अधिक काळ थांबवता येणार नाहीत, लॉकडाउनचा फायदा आम्हाला मिळतो आहे, आमच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम काही प्रमाणात दिसत आहे.
यावेळी दिल्लीतील मजुरांची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतच व्यवस्था करावी, स्थलांतरामुळे हरियाणात वाढत आहेत रुग्ण अशी विनंती हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
लॉकडाउन उठवल्यानंतर राज्यांना आपली रणनीती तयार करावी लागेल लॉकडाउनचा कालावधी आणखी महिनाभरासाठी वाढवण्याची आवश्यकता अशी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, अर्थव्यवस्थेबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, आमची अर्थव्यवस्था चांगली असे स्पष्टीकरण पंतप्रधानांनी दिले आहे.