• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पनवेल वासीयांना मोठा धक्का; तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू


पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यामधील पनवेल महानगरपालिका क्षेत्राला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी ८ मे रोजी कामोठे येथील २ तर खांदा वसाहतीतील १ अश्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून पनवेल महानगरपालिका मधील सर्वात मोठी दुःखद घटना घडली असल्याने पनवेल परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. तसेच २४ तासात पनवेल महापालिका हद्दीत आणखी ८ रुग्ण कोरोना बाधित सापडले असून त्यातील ३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली आहे.

खारघर येथील सेक्टर- ३४. साई मन्नत बिल्डिंग येथील ३६ वर्षीय एक व्यक्ती कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आलेली असून ही व्यक्ती सेबी भवन-२ , बिकेसी, मुंबई येथे एजीएम म्हणून कार्यरत असल्याने कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर-६ मधील शितालधारा कॉम्प्लेक्स येथील २३ वर्षीय एक महिला कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आली असून सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्ती याआधी कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्यापासून या महिलेस संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर येथील सेक्टर-३४ मधील सिमरन सफायर सोसायटी येथील ३४ वर्षीय एक व्यक्ती कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आली असून ही व्यक्ती मुंबई एअरपोर्ट येथे CISF सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याने या व्यक्तीला एअरपोर्ट मधूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खारघर येथील सेक्टर-३ मधील मातोश्री बिल्डिंग येथील ३५ वर्षीय व्यक्तीला कोव्हीड-१९ या रोगाची लागण झाली असून ही व्यक्ती अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. कामोठे येथील सेक्टर-३४ मधील मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील दोन महिला कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या असून त्यापैकी ५४ वर्षीय एक महिलेचा ब्लडप्रेशर आणि लिव्हर इन्फेक्शन चा त्रास असून ही महिला दिनांक ४ मे रोजी २०२० रोजी गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. ८ मे रोजी त्यांचे दुःख निधन झाले आहे. सदर महिलेची सून कामोठे येथील ऑल इज वेल ह्या क्लिनिकमध्ये काम करीत असून तिच्या पासून या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर-११मधील साईकृपा कॉम्प्लेक्स येथील ७० वर्षीय एक व्यक्ती कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह असल्याने ही व्यक्ती दिनांक ५ मे २०२० रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली असून सदर व्यक्तीला डायबेटीसचा त्रास असून शुक्रवारी ८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. खांदा कॉलनी येथील सेक्टर-७ मधील श्री गणेश बिल्डिंग येथील ५२ वर्षीय एक व्यक्ती कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह असल्याने ही व्यक्ती अदानी एनर्जी कंपनी गोवंडी मुंबई येथे कार्यरत असल्याने सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असून ४ मे ला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले असून त्यांचे दुःख निधन झाले आहे. यामुळे खांदा वसाहत आणि कामोठे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.