• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरवा


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना

महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरवा

- सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणीपनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी लेखी निवेदनही दिले असून यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सातत्याने स्वच्छतेचे आवाहन केले जात असुन, सध्या कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणणे करीता संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. ३ मे २०२० पर्यंत 'India Lockdown' च्या ह्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्यासाठी व कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वर्गासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे. कामधंदा बंद असल्यामुळे व हॉटेल् आणि खानावळ बंद असल्यामुळे त्यांनी कसे जगावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची ४० हून अधिक वाढ असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना अन्ना वाचुन वंचित राहून नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची उपासमारीची वेळ येऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात येणे गरजेचे असून या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवाकरीता पनवेल महानगरपालिकेमार्फत धान्य / जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली आहे.

9 views0 comments