• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या रायगड संघटक पदी जगदीश दगडे यांची निवडपनवेल : प्रतिनिधी

पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे बैठक पार पडली . यावेळी महाराष्ट्र माझा न्युज चैनल चे संपादक व धडाडीचे पत्रकार माननीय जगदीश दगडे यांची रायगड जिल्हा संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. याचवेळी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दीपाली पाटील यांचेही निवड पत्र देण्यात आले. या बैठकीस समिती सचिव डॉक्टर वैभव पाटील, सहसचिव अमोल सांगळे, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव यांच्यासह शिल्पा शिंदे , चंद्रभान ठाकूर, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, प्रशांत दगडे, राकेश दगडे, देवेंद्र धोने, राजेश काळे, गणेश काळे व इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली तर जगदीश दगडे यांनी समितीचे संघटनात्मक काम करून तळागाळातील पत्रकार बांधवांना एकत्र आणून त्यांना मदतीचा हात देवू तर सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार असल्याचे म्हटले आहे.