• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने व.पो.नि सुजाता तानवडे "कोरोना योद्धा" ने सन्मानित


आंदोलन : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक समाजसेवक, राजकीय नेते, शासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलीस पुढे सरसावत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गरीब, गरजू नागरिकांसाठी अत्यावश्यक वस्तु आणि सेवा पुरविण्यासाठी सक्षम झाले. अशा कर्मवीरांचा महाराष्ट्रातून पत्रकार उत्कर्ष समितीमार्फत "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात येत आहे.

अशातच रसायनी परिसरातील कोरोना पार्श्वभुमीवर लॉक डाऊनच्या सुरुवातीपासूनच्या घटनांचा आढावा घेत पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचा "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात आला.

व.पो.नी सुजाता तानवडे यांनी वेळोवेळी रसायनीतील नागरिकांना सुरक्षित राहा-घरात राहा, सामाजिक अंतर राखा, शासनाचे नियम पाळा अशा सुचना देत जागरूकतेचे आवाहन देखील केले. याचबरोबर रसायनीच्या चोहोबाजूने सीमा सील करून आपल्या पोलीस टीम चे कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आले होते.

रसायनी परिसराला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सुजाता तानवडे यांचा मोठा सहभाग आहे. तसेच शासनाने कालांतराने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रसायनीत काही भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतरही सुजाता तानवडे यांच्या आदेशानुसार रसायनी पोलिसांचा बंदोबस्त देत कंटेन्मेंट झोनला सील करण्याची जबाबदारी वेळीच पार पाडली. अशा विविध कामगिरीवर नजर टाकत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोरोना पार्श्वभूमीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून रसायनी पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर केलेले सेवाकार्य ला सलाम करत "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान चिन्ह व प्रशंसापत्र देऊन पत्रकारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच यावेळी वासंबे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदा दळवी यांच्याही कार्याचा गौरव करत सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सहसचिव‌ अमोल सांगळे, कोकण विभाग प्रमुख अलंकार भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव, रायगड जिल्हा सचिव गौतम सोनवणे, रायगड जिल्हा सहसचिव पॅडी कुरंगळे, खालापूर तालुका सदस्य रावसाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.