• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेले रक्तदान शिबिर संपन्न


पनवेल : प्रतिनिधी

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक १ जुन रोजी वाढदिवसाचे औचित्य साधत एडवोकेट अभिजीत सुरते व रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या सहकार्याने पेठगाव, कोळखे तालुका पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , सचिव डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक एडवोकेट अभिजीत सुरते, ग्रामपंचायत सदस्य श्री. परशुराम सुरते ( माजी सरपंच ), श्री. माया सुरते , मोहन डाकी, दशरथ सुरते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या शिबिरास आयडियल पार्क कमिटी व गावदेवी क्रिकेट संघ आणि पेठगाव ग्रामस्थ मंडळ यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग उल्लेखनीय होते.

यावेळी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) चे भान राखून व योग्य ती काळजी घेत हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. व 40 रक्ताच्या बाटल्या रक्तपेढीकडे जमा करण्यात आल्या.