• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

निसर्ग वादळामुळे दूषित झालेल्या भिसेगाव परिसराला शरद हजारे यांनी केले निर्जंतुकीकरण !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग महामारीची लागण भिसेगाव परिसराला लागू नये म्हणून शासन - प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत असतानाच निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या दूषित वातावरणाचा परिणाम भिसेगावकरांना होऊ नये म्हणून भिसेगाव शाखाप्रमुख शरद हजारे यांनी संपूर्ण परिसरात सॅनिटायझर जंतूनाशक व धूर फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केल्याने नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित रहाणार आहे.

कर्जत विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार मा.श्री.महेंद्रशेट थोरवे आणि नगराध्यक्ष सौ. सुवर्णा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भिसेगाव शाखाप्रमुख श्री.शरद हजारे यांनी स्वखर्चाने रहिवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी भिसेगाव परिसरात (औंदुबर सोसायटी, राधा कृष्ण अपा ., पाल टाॅवर, कातकर वाडी,सटुआई नगर, श्री अंबे भवानी माता मंदिर परिसर , अॅफेनीटी गार्डन,कडू चाळ , तसेच भिसेगावात ) येथे जंतुनाशक फवारणी व धुरफवारणी करण्यात आली. यामुळे भिसेगाव परिसरातील रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे . पहिले कोरोना व नंतर निसर्ग चक्री वादळामुळे पाऊस पडल्याने परिसरात खूपच घाण झाली , झाडे पडून अनेकांचे नुकसान झाले तसेच कचरा सर्वत्र पसरल्याने दुर्गंधीयुक्त दमट वातावरण तयार झाले होते , अशा वातावरणामुळे जीव - जंतू , डासांची उत्पत्ती , किडे - मकुडे , तयार होऊन त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये , शिवाय साप बाहेर पडून कुणाला चावू नये , याचा धोका या जंतू फवारणी व धूर फवारणीमुळे टळला असून भिसेगाव शाखाप्रमुख शरद हजारे यांनी स्वखर्चाने केलेले हे कार्य सर्वांना कौतुकास्पद असून भिसेगाव नागरिकांनी त्यांचे आभार मानले .