• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

नियमबाह्य शैक्षणिक शुल्क आणि इमारत निधी आकारू नका..

नियमबाह्य शैक्षणिक शुल्क आणि इमारत निधी आकारू नका, बहुजन विद्यार्थी संघटनेचे शिशु मंदिर शाळेला निवेदन

वावोशी : जतिन मोरे

खोपोली येथील शिशु मंदिर या इंग्रजी माध्यमिक शाळेकडून विद्यार्थ्यांकडून प्रवेश फीमध्ये नियमबाह्य अतिरिक्त इमारत निधीही आकारला जात आहे. त्याविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेने या शाळेला निवेदन देण्यात आले असून त्वरित हा प्रकार थांबवण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

देशात आणि राज्यात सध्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात अनेक पालक बेरोजगार झाले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा वेळी या पालकांकडून शाळेने विद्यार्थ्यांच्या प्रवेश फी साठी तगादा लावू नये तसेच त्यांच्याकडून शासनाचे नियमांना अधिन राहून कोणत्याही स्वरूपाचे इमारत निधी घेण्यात येऊ नये यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून खोपोली येथील शिशु मंदिर या शाळेला निवेदन देण्यात आले आहेे. यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुशिल गायकवाड, उपाध्यक्ष निशांत पवार, सचिव जतिन मोरे, खोपोली शहर अध्यक्ष रोहित वाघमारे, खालापूर तालुका उपाध्यक्ष आकाश दबडे, विवेक रोकडे, सुधागड तालुका कार्याध्यक्ष सिद्धांत गायकवाड, महेंद्र ओव्हाळ हे बहुजन विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.